मेकअप आर्टिस्टची केली फसवणूक 

क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली ठगाने मेकअप आर्टिस्ट महिलेची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

बिट कॉइनमध्ये गुंतवणूक करायची याबाबत तक्रारदाराने यूटय़ुबवर व्हिडीओ पाहिला होता. व्हिडीओ पाहत असताना त्यांना एका ट्रेडिंग अप्सची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी एक अप्स मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले. त्या अप्सच्या माध्यमातून त्या तीन वर्षांपासून ट्रेडिंग करत होत्या. जून महिन्यात त्यांची एकाशी ओळख झाली. त्याने त्याचा नंबर महिलेला दिला. त्यांना बिट कॉइन खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांना चलनाची आवश्यकता होती. त्याने महिलेला हिंदुस्थानी चलनाचे 5 लाख रुपये बदलून देतो असे सांगितले. महिलेने त्याला पैसे दिले. 15 दिवस उलटल्यानंतर महिलेने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. तो महिलेला उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली.