‘मूर्ती’ दांपत्याचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर

इन्फोसिसनचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती हे दोघे ‘पॉवरफुल कपल’ म्हणून ओळखले जातात. या दोघांचे आयुष्य रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मूर्ती दांपत्याच्या चरित्रपटावर निर्माता- दिग्दर्शक अश्विनी अय्यर आणि नितेश तिवारी  ही जोडी काम करत आहे.

हा चित्रपट हिंदी, तामीळ आणि कन्नड भाषेत बनवला जाणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या ‘मूर्ती’ या नावाने हा प्रोजेक्ट केला जात आहे. चित्रपटाची पटकथा तयार झाल्यानंतर कलाकारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. सध्या अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी हे दोघे ‘मूर्ती’ कुटुंबातील प्रत्येक लहानमोठी माहिती गोळा करत आहेत. केवळ कमर्शिअल हिट चित्रपट बनवणे उद्देश नसल्याचे अय्यर यांनी सांगितले.