
आई ही आई असते, तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही. प्राण्यांच्या बाबतीत देखील बऱ्याचदा हा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. भंडाऱ्यात देखील एक अशीच घटना समोर आली आहे. बचाव करण्यात आलेल्या बछड्याला मादी बिबट जंगलात घेऊन जातानाचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या सिरेगाव बांध गावात घडली आहे.
आईचा जीव बछड्यात… रेस्क्यू करण्यात आलेल्या बछड्याला भेटण्यासाठी मादी बिबटाची धडपड#leopard pic.twitter.com/rRI2L16y9w
— Saamana (@SaamanaOnline) July 10, 2024
सिरेगाव बांध गावातील नामदेव गहाणे यांच्या घरी नवीन सौचालयाचे बांधकाम सुरू असताना 7 फूट खोल गटारच्या गाड्यात बिबट्याचा बछडा पडला असल्याचे संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली. लगेच नवेगाव बांध येथील बचाव पथकाने गटाराच्या गाड्यात पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला बाहेर काढून त्याच ठिकाणी एका प्लस्टिकच्या कॅरेट मध्ये ठेवले असता मादी बिबट्याने रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी येत कॅरेट मधून बिबट्याला बाहेर काढून जंगलाच्या दिशेने घेऊन जात असल्याची घटना कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.