भयंकर अपघात; कोपरगांव तालुक्यात डंपरने स्कुटीला उडवले, महिलेचा जागीच मृत्यू

कोपरगांव तालुक्यात पोहेगांव सोनेवाडी रस्त्यावर नऊचारी वस्सल मॉडेल स्कूल जवळ पोहेगांवच्या दिशेने आलेल्या डंपरणे स्कुटील जोरदार धडक दिली. या भयंकर धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

तालुक्यातील नऊचारी परिसरात सदर घटना घडली आहे. शेतातील कामे आटपून तुषार रामदास वाघा हा आईला दुचाकीवरुन घरी घेऊन चालला होता. नऊचारी ओलांडून स्कुटी रस्त्यावर आली असता सोनेवाडीच्या दिशेने जाणाऱ्या डंपरने स्कुटीला जोरदार धडक दिली. या भयंकर धडकेत वंदना रामदास वाघ (वय 48) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोहेगाव सोनेवाडीतील ग्रामस्थ घटनास्थळी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. घटना घडताल शिर्डी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. परंतु झगडे फाटा मार्गे नऊचारी कडे येत असताना पाऊस झाल्याने आणि रस्त्यावर खडी असल्यामुळे पलटी झाली. सुदैवाने चालकाला काही झाले नाही. त्यानंतर दुसऱ्या रुग्णावाहिकेने मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. पोहेगाव परिसरातील ही अपघाताची दुसरी घटना असून संगमनेर-कोपरगाव रोडवरही मोटरसायकलचा दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. नऊचारी परिसरातील अपघात झाल्यानंतर डंपर चालक पळून गेला. पोलिसांच्या माध्यमातून डंपरच्या चालक आणि मालकाचा शोध घेतला जात आहे.