जगातील असा देश जेथे लोकसंख्येपेक्षा गाईंची संख्या जास्त…

हिंदू पुराणांनुसार गाय ही केवळ दुभत जनावर नसून तिला देवता मानले जाते. पृथ्वीतलावर असा ही एक देश आहे जिथे माणसांपेक्षा गायींची लोकसंख्या जास्त आहे.

या देशाचं नाव आहे उरूग्वे. उरूग्वेमध्ये लोकसंख्येपेक्षा गाईंची संख्या जास्त आहे. या देशातील गाईंच्या संख्येचे प्रमाण प्रत्येक एका माणसामागे 4 गाई असे आहे. त्यामुळे या देशामध्ये तब्बल 12 दशलक्ष गाई असल्याचे सांगितले जाते.

उरूग्वेची एकूण लोकसंख्या केवळ 35 लाख असून यामध्ये 828 हिंदुस्थानी नागरिकांचा देखील समावेश आहे. मात्र या लोकसंख्येमध्ये मुख्यत: ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिम धर्माचे जास्त असल्याने तेथील मासं उद्योगात गाईंचा देखील समावेश आहे.

येथील बहुतांश लोकसंख्या गोमांस आणि लोकरीचा व्यवसाय करतात. त्यापैकी 65% लोकांसाठी हा प्रमुख उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहेत. त्याबरोबरचं 12% लोकसंख्या भाजीपाला, शेती इत्यादी व्यवसाय करतात. तर 11% लोकसंख्या दुग्धव्यवसाय करतात.