
भुशी धरणामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाचजण वाहून गेल्याच्या घटनेला आठ दिवस उलटून होत नाहीत तोच पर्यटकांची बेफिकिरी पुन्हा समोर आली आहे. पोलीस आणि प्रशासनाचे निर्बंध धुडकावत रविवारी पुन्हा वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील सहारा पुलाच्या समोरील डोंगरावर भटकंती करणाऱया सात पर्यटकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशासनाने ताम्हिणी अभयारण्यातील जंगलवाटा, धबधबे येथे जाण्यास बंदी जाहीर केली आहे. तर, जुन्नर वन विभागाने जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यांतील 22 ठिकाणे पर्यटकांसाठी प्रतिबंधित केली आहेत. प्रशासनाच्या या आदेशांना झुगारून, बंदीचे फलक लावलेले असताना इतर मार्गाने पर्यटक धबधब्यांच्या ठिकाणी जात आहेत. जिल्हाधिकाऱांचे बंदी आदेश असताना व त्याबाबत जागृती करणारे फलक लावलेले असतानादेखील काही तरुण पर्यटक डोंगरावर फिरत होते.