जन्मतः अंधांना दिसू लागणार, एलन मस्क यांनी दाखवला आशेचा किरण

एलन मस्क यांची ब्रेन- चिप स्टार्टअप कंपनी ‘न्यूरालिंक’ने जन्मापासून दृष्टी नसलेल्या व्यक्तींना आनंदाची बातमी दिली आहे. न्यूरालिंकला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) टेस्टेमेंटल इम्प्लांट डिव्हाईससाठी मान्यता मिळाली आहे. हे डिव्हाईस दोन्ही डोळे आणि ऑप्टिक शिरा गमावलेल्या लोकांना पाहण्यास सक्षम करेल म्हणजे आता अंधही पाहू शकणार आहे.

एलन मस्क यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. न्यूरालिंकच्या ब्लाइंडसाईट डिव्हाईसमुळे डोळे आणि ऑप्टिक शिरा दोन्ही गमावलेल्या लोकांनाही पाहता येणार आहे. व्हिज्युअल कॉर्टेक्स ठीक असेल तर जन्मापासून अंध असलेल्यांनाही प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळेल, असे सांगण्यात आलेय. यामुळे समस्त नेत्रहीनांना एलन मस्क यांनी आशेचा किरण दाखवलाय.

एलन मस्क यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये जॉर्जीला फोर्जचा एक फोटो शेअर केला आहे. जॉर्जीला फोर्ज हे एका मालिकेतील पात्र आहे. मालिकेत हे पात्र जन्मापासून अंध आहे, परंतु गॅजेट्सच्या मदतीने तो पाहू शकतो.

डिव्हाईस कसे चालेल

ब्रेकथ्रू डिव्हाईस याविषयी अधिक माहिती अशी आहे की, सुरुवातीला दृष्टी ऑटिक ग्राफिक्सप्रमाणे कमी रिझोल्यूशनची असेल, पण भविष्यात ते नैसर्गिक दृष्टीपेक्षा ही चांगली असू शकते आणि आपल्याला इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट किंवा रडार तरंगलांबीमध्ये पाहण्याची क्षमता देऊ शकते.

ब्रेकथ्रू डिव्हाईस

न्यूरालिंकने एफडीएच्या मंजुरीला दुजोरा देत म्हटले आहे की, ब्लाइंडसाइटला अमेरिकन सरकारी संस्थेकडून ‘ब्रेकथ्रू डिव्हाईस’ नाम मिळाले आहे. एफडीएचे ब्रेकथ्रू डिव्हाईस पदनाम विशेष वैद्यकीय उपकरणांना दिले जाते जे जीवघेण्या परिस्थितीवर उपचार करण्यासाठी किंवा निदान करण्यासाठी उपयुक्त आहेत.