विमानतळावर एका केळ्याची किंमत 565 रुपये

इस्तांबूल विमानतळावर एका केळ्याची किंमत तब्बल 565 रुपये ठेवण्यात आली आहे. विमानतळावर कोणतीही वस्तू इतकी महाग का मिळते, असा प्रश्न अधूनमधून ऐकायला मिळतो. परंतु विमानतळावरच्या सामानांची किंमत ठरवण्यासाठी कोणताही नियम नाही किंवा नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे एअरपोर्टवरील दुकानदार किंवा आऊटलेट्स आपल्या मर्जीप्रमाणे सामानांची किंमत ठरवतात. त्यामुळे ते महाग ठरते. विमानतळावर मिळणारी पाण्याची बाटली, चहा, कॉफी, सँडविच, स्नॅक्स यांसारख्या वस्तूंच्या किमतीसुद्धा अवाच्या सवा भावात विकल्या जातात.