वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून ज्येष्ठ नागरिकाने जीवन संपवले

मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवरून उडी मारून एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली आहे. भावेश सेठ (56) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

भावेश सेठ हे त्यांच्या गाडीने वांद्रे वरळी सी लिंकवर आले. पूलाच्या मधल्या भागात त्यांनी गाडी थांबवली व त्याच्या कठड्यावरून त्यांनी समुद्रात उडी घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस व बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. बचाव पथक सध्या सेठ यांचा शोध घेत आहेत. पोलिसांना सेठ यांच्या गाडीतून सुसाईड नोट सापडली आहे.