
जम्मू कश्मीरच्या पहलगाम हल्ल्याप्रकरणी एक नवीन खुलासा झाला आहे. या हल्ल्यात फारुख अहमद या दहशतवाद्याचे नाव समोर आले आहे. दहशतवाद्यांनी आधी खोऱ्यातील काही लोकांना एकत्र केले आणि हल्ल्यासाठी त्यांची मदत घेतली. फारुक अहमद हा लश्कर ए तोयबाचा कमांडर असून तो पाकव्याप्त कश्मीरमध्ये लपून बसला आहे.
गेल्या दोन वर्षात याच लोकांच्या मदतीने दहशतवाद्यांनी खोऱ्यात खुप सारे हल्ले केले होते. पाकिस्तानच्या तीन भागातून हे दहशतवादी कश्मीरमध्ये येतात. खोऱ्यातून रस्त्यांच्या मार्गे यायला फारुक दहशतवाद्यांना मदत करतो. फारुख अहमदचे कुपवाडामध्ये घर होतं. सुरक्षा दलाने हे घर जमीनदोस्त केले आहे. 1990 ते 2016 दरम्यान फारूख सतत पाकिस्तानला जात होता. पहलगाम हल्ल्यानंतर फारुखच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं गेलं.