दहशतवाद्यांशी लढताना मुलाला आलेले वीरमरण, आता आईला जावं लागणार पाकिस्तानात

दहशतवाद्यांशी लढताना पोलीस अधिकारी मुदासिर शेख यांना वीरमरण आले होते. त्यांना मरणोत्तर शौर्य पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते. पण आता त्यांच्या मातोश्रींना देश सोडावा लागणार आहे. कारण हिंदुस्थान सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. शेख यांच्या आई पाकव्याप्त कश्मीरच्या रहिवासी असल्याने त्यांना देश सोडावा लागणार आहे.

मुदासिर शेख हे 2022 साली कश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना धारातीर्थ झाले. त्यांच्या मृत्यूनंतर सरकारने त्यांना शौर्य पुरस्कार दिला. तेव्हा शेख यांच्या आई शमीमा अख्तर यांनी हा पुरस्कार स्विकारला होता. अख्तर यांचा 1990 साली पोलीस अधिकारी मोहम्मद मकसूद यांच्याशी झाला होता. गेल्या 35 वर्षांपासून त्या हिंदुस्थानात राहतात. त्यांचे मूळ गाव हे पाक व्याप्त कश्मीरमध्ये आहे. आता हिंदुस्थान सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केल्याने अख्तर यांना हिंदुस्थान सोडावा लागणार आहे.