
मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेवा लवकरच महाराष्ट्रात येणार आहे. नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनहून महाराष्ट्रात आणली जाणार आहे. लंडनमध्ये झालेल्या लिलावात राज्य सरकारने 47.15 लाख रुपयांना खरेदी केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.