
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वर्धा जिह्यातील युवासेना पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जिल्हा युवा अधिकारीपदी प्रशांत राजेंद्र सातपुते (वर्धा व हिंगणघाट विधानसभा) तसेच महेश मोरेश्वरराव चौधरी (देवळी पुलगाव व आर्वी विधानसभा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.