
महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांची देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या नियुक्ती प्रस्तावाला मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिली. ते 14 मे रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेऊन पदभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती त्यांना पदाची शपथ देतील. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे पुढील महिन्यात 13 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर दुसऱयाच दिवशी न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. गवई हे मूळचे अमरावती येथील रहिवाशी आहेत.