
फॅफ डय़ू प्लेसिस (62), कर्णधार अक्षर पटेल (43) आणि विपराज निगमच्या (38) तडाखेबंद खेळानंतरही यजमान दिल्ली कोलकात्याला नमवण्यात अपयशी ठरली आणि कोलकात्याने 14 धावांनी सामना जिंकत आपणही प्ले ऑफच्या शर्यतीत असल्याचे दाखवून दिले. दिल्ली पराभवानंतरही 12 गुणांसह चौथ्या तर कोलकाता विजयानंतरही 9 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
आज कोलकात्याला प्ले ऑफच्या शर्यतीत धावण्यासाठी दिल्लीला गाठणे गरजेचेच होते आणि त्यांच्या सुनील नरीन आणि वरुण चक्रवर्तीने करून दाखवले. डय़ू प्लेसिस आणि अक्षर पटेलने चौथ्या विकेटसाठी 76 धावांची भागी रचत दिल्लीला विजयाच्या मार्गावर ठेवले होते. मात्र नरीनने पटेलला बाद करून ही जोडी पह्डली आणि मग दिल्लीच्या डावाला जी घसरण लागली ती पुणीच थांबवू शकला नाही. फिरकीवीर नरीन आणि चक्रवर्तीने दिल्लीच्या विजयाच्या आशास्थानांना धडाधड बाद करत कोलकात्याला विजयासमीप आणले. तळाला विपराज निगमने 19 चेंडूंत 38 धावा ठोकत दिल्लीच्या विजयासाठी शेवटपर्यत झुंज दिली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. 3 विकेट आणि 27 धावा फटकावणारा नरीनच सामनावीर ठरला.
त्याआधी कोलकात्याच्या डावात एकाही फलंदाजाला धावांची पन्नाशी गाठता आली नाही. मात्र आघाडीच्या सर्वच फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त खेळ्या आणि तळाला रिंपू सिंह आणि आंद्रे रसलच्या फटकेबाजीने कोलकात्याला अनपेक्षितपणे 204 पर्यंत नेले. अंगपृष रघुवंशीने 44 धावांची सर्वोच्च खेळी करताना रिंपूबरोबर 61 धावांची भागी केली. हीच भागी कोलकात्याला विजय मिळवून देणारी ठरली.