
स्पर्धात्मक क्रिकेटचा कोणताही अनुभव नसताना आयपीएलमध्ये निवड झालेला आणि काल 35 चेंडूंत शतक ठोपून अवघ्या जगाचे लक्ष वेधणाऱ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला थेट टीम इंडियाची लॉटरी लागली आहे. तसेच 16 वर्षीय मुंबईकर आयुष म्हात्रेचेही भाग्य फळफळले असून हे दोघे युवा क्रिकेटपटू आयपीएलनंतर ‘हिंदुस्थानी अ’ संघाबरोबर इंग्लंड दौऱ्यावर असतील असे वृत्त विश्वसनीय सूत्रांनी दिले आहे. विशेष म्हणजे, तेव्हाच हिंदुस्थानचा मुख्य संघ पाच कसोटी सामने खेळणार आहे. दोघांचे नशीब बलवत्तर असले तर त्यांच्यासाठी कसोटी क्रिकेटचेही दार उघडले जाईल.
हिंदुस्थानचा 19 वर्षांखालील संघ येत्या जूनमध्ये इंग्लंडमध्ये 5 एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. मात्र, ‘बीसीसीआय’कडून याबाबत अद्याप अधिपृत घोषणा झालेली नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानी संघ 21 जूनला लंडनला पोहोचेल. या काळात हिंदुस्थानी महिला संघ आणि हिंदुस्थानी मिश्र दिव्यांग संघदेखील इंग्लंड दौऱ्यावर असतील. हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघात आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. राजस्थान सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि चेन्नई सुपर किंग्जचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे यांना इंग्लंड दौऱ्यासाठी हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघात स्थान मिळाले आहे. हे दोन्ही फलंदाज सध्या आयपीएलमध्ये धुमापूळ घालत आहेत. वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक ठोकण्याचा पराक्रम केला. याचबरोबर चेन्नई संघातील आयुष म्हात्रेनेही दोन आयपीएल सामन्यांमध्ये लक्षवेधी फलंदाजी केली. 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आगामी वर्षाच्या सुरुवातीला झिम्बाब्वे आणि नामिबियाच्या यजमानपदाखाली खेळवली जाणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानसाठी इंग्लंडचा दौरा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा ठरणार आहे.
सारं काही सलामीवीराच्या शोधासाठी
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे या युवा आणि सलामीला खेळणाऱ्या खेळाडूंना इंग्लंडचं वातावरण चांगलंच मानवू शकतं. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माची सलामीची लाजिरवाणी कामगिरी अजूनही सर्वांच्या डोळय़ात खुपतेय. सातत्यपूर्ण अपयशी कामगिरीनंतरही त्याला कसोटी संघात यायचेय. तो खेळणार की नाही याबाबत अद्याप साशंकता असल्यामुळे या दोन्ही धडाकेबाजांना इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. अजूनही हे सारे जर तर असले तरी असं घडू शकत हे पुणीही नाकारत नाहीय आणि नाकारू शकतही नाही.