मतदार यादीशी आधार जोडणे ऐच्छिकच

मतदार यादीतील अनियमितता दूर करून त्यात पारदर्शकता आणण्याकरिता आधारशी लिंक करणे तूर्तास तरी मतदारांना बंधनकारक नसेल, असे केंद्र सरकारमधील सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सदोष मतदार यादीवरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले होते. अनेक ठिकाणी मतदारांच्या संख्येच्या तुलनेत अधिक मतदान झाल्याचे कॉँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने सप्रमाण सिद्ध केले. त्यावर मतदार यादीतील अनियमितता दूर करून पारदर्शकता आणण्याकरिता आधारशी लिंक करण्याचे आश्वासन निवडणूक आयोगाने दिले. मात्र मतदार यादीशी आधार लिंक करण्याची बाब तूर्त तरी ऐच्छिकच राहील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.