
काही लोकांकडे पाहून त्यांच्या वयाचा अंदाजच येत नाही. काहीजण वयाच्या ५० व्या वर्षीही ते ३० वर्षांचे दिसतात. काहीजण मात्र कमी वयातच वृद्ध दिसू लागतात. वृद्धत्व रोखण्यासाठी, आपण अनेकदा महागड्या उत्पादनांचा वापर करतो. पण तरुण दिसण्यासाठी महागड्या स्किन केअर उत्पादनांचा वापर करण्यापूर्वी आपण आपल्या आहाराकडे लक्ष देणे हे खूप गरजेचे आहे. आहार योग्य नसेल तर वयाच्या आधी त्वचेची चमक कमी होऊ शकते. म्हणूनच योग्य आहार हा खूप गरजेचा आहे. आहारात अशा काही गोष्टी समाविष्ट केल्या तर, आपण नक्कीच तरुण दिसायला लागु.
वृद्धत्व रोखण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे
टोमॅटो हे वृद्धत्वविरोधी आहारात फायदेशीर मानले जाते. टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचा अँटी-ऑक्सिडंट असतो. हे त्वचेचे अनेक आजारांपासून संरक्षण करते. हे त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून देखील वाचवते. यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत आणि त्वचा तरुण दिसते.
त्वचेवर कोरफडीचा वापर फायदेशीर आहे, परंतु आहारात त्याचा समावेश केल्याने तुमच्या वयापेक्षा तरुण दिसण्यास मदत होऊ शकते. कोरफडीमध्ये गिब्बेरेलिन आणि ऑक्सिन नावाचे दोन हार्मोन्स आढळतात. या दोन्ही संप्रेरकांमध्ये उपचारात्मक आणि दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. हे त्वचेची जळजळ कमी करतात आणि नवीन पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देतात. याशिवाय, त्यात असे अनेक अँटी-ऑक्सिडंट्स देखील आढळतात. ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार राहते.
तुमच्या वयापेक्षा तरुण दिसण्यासाठी जास्मिन चहा प्या. ते त्वचेला हायड्रेट ठेवते. हे त्वचेची लवचिकता वाढविण्यास आणि त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ ठेवण्यास मदत करू शकते. त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आढळतात, जे त्वचेची रोगप्रतिकारक शक्ती राखतात.
अक्रोड त्वचा चमकदार आणि तरुण ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आढळतात. ज्यामुळे त्वचा चमकदार होते. तसेच शरीरातील कमजोरी दूर होते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)