चीनमधील रेस्टॉरंटला भीषण आग, 22 जणांचा होरपळून मृत्यू

चीनच्या लियाओयांग शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या भीषण आगीत 22 जणांचा होरपळून मृत्यू झाला झाल्याची घटना घडली आहे. यात तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

चीनच्या सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12:25 वाजता ही आग लागली. आग लागताच अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी तातडीने तेथे पोहोचल्या, पण आग इतकी भीषण होती की, 22 जणांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, चीनमध्ये वारंवार अशा आगीच्या घटना घडत असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे असे अपघात वारंवार घडत असल्याचं सांगण्यात येत आहे.