अहमदाबादमध्ये बेकायदेशीरपणे राहत असलेल्या बांगलादेशींच्या घरांवर बुलडोझर, पालिकेची सर्वात मोठी कारवाई

गुजरातच्या अहमदाबादमध्ये महानगरपालिकेने बेकायदेशीर बांधकामाविरोधात मोठी मोहीम राबवली. या अभियानाअंतर्गत चंदोला तलावाजवळच्या सर्वध बेकायदेशीर झोपडपट्ट्या हटवण्यात आल्या. या जागेत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहत होते अशी माहिती पोलिसांनी दिली.

या भागात 100 बांगलादेशी बेकायदेशीरपणे राहत होते अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याच भागात महानगरपालिकेने मोहीम राबवली. ज्या भागात बांगलादेशी बेकायदेशीरपणे राहत होते त्यांची घरं पाडण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने गुजरात सरकारला दिले होते. त्यानंतर पहिल्या टप्प्यात महानगरपालिकेने या बांगलादेशींच्या घरावर कारवाई केली.

पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चंदोला भागात ही कारवाई करण्यात आली. काल दुपारी या भागातील वीज जोडणी कापण्यात आली होती. चंदोला भागात अतिक्रमण विरोधी मोहीमेत 80 बुलडोझर आणले होते. अतिक्रमण विरोधातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.