
जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव अनेक रिसॉर्ट्स आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळं बंद करण्यात आली आहेत. पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता, त्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
जी पर्यटनस्थळं बंद करण्यात आली आहे ती जागा सुंदर दऱ्या खोऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे दुधपात्री आणि वैरीनागसारख्या पर्यटनस्थळांवर बंदी घातली असून या भागातील 48 रिसॉर्ट्स बंद करण्यात आले आहेत. सुरक्षा दलाच्या सल्ल्यानुसार जम्मू कश्मीरच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. जम्मू कश्मीरमध्ये पुन्हा हल्ला होऊ शकतो असा अंदाज गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला होता. त्यामुळेच राज्यातील 87 पैकी 48 पर्यटन स्थळ बंद करण्यात आले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यानंतर खोऱ्यात काही दहशतवादी सक्रिय झाले आहेत. आणि त्यांना पुन्हा हल्ला करण्याचे आदेश मिळाले आहेत.