
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवाद्यांना पाठिंबा आणि प्रशिक्षण दिल्याच्या कबुलीजबाब दिला आहे. त्यांच्या वक्तव्याचा दाखल देत हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला घेरले आहे. ख्वाजा आसिफ यांनी दहशतवाद्यांना पाठिंबा आणि आर्थिक रसद तसेच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याबाबत विधान करत कबुलीजबाब दिला होता. तोच मुद्दा उचलत हिंदुस्थानने आता पाकिस्तानला घेरले आहे.
संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलताना हिंदुस्थानच्या उप-स्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा गैरवापर करून हिंदुस्थानविरोधात अपप्रचार आणि निराधार आरोप केल्याबद्दल तीव्र निषेध केला. त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी समर्थनाच्या इतिहासाबद्दल आसिफ यांच्या कबुलीजबाबाचा संदर्भ दिला. भारताविरुद्ध अपप्रचार करणे आणि निराधार आरोप करणे पाकिस्तानकडून सुरू आहे. मात्र, जगभरात ख्वाजा आसिफ यांनी अलिकडच्या टेलिव्हिजन मुलाखतीत दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा आणि निधी देण्याचा पाकिस्तानचा इतिहास कबूल केल्याचे म्हटले आहे, असे पटेल यांनी सांगितले.
खाव्जा यांची ही उघड कबुली पाकिस्तान हे एक दुष्ट राष्ट्र असल्याचे आणि ते जागतिक दहशतवाद पोसत असल्याचे स्पष्ट करते. ते जागतिक दहशतवादाला खतपाणी घालत प्रदेश अस्थिर करत आहेत. आता जग याकडे डोळेझाक करू शकत नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील नेत्यांनी हिंदुस्थानला पाठिंबा दिला आहे. 2008, 26/ 11 च्या मुंबई हल्ल्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरला आहे, त्यात 26 जणांचा बळी गेला आहे., असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्काय न्यूजवर कबूल केले की पाकिस्तान दहशतवादी संघटनांना आश्रय देतो आणि त्यांना निधी देतो, असे त्यांनी म्हटले होते. पाकिस्तानमधील दहशतवादी गटांचा अमेरिका प्रॉक्सी म्हणून वापर करत होती आणि यापूर्वी त्याच दहशतवादी गटांना वॉशिंग्टनमध्ये व्हीआयपींसारखे वागवले जात होते. 80 च्या दशकात सोव्हिएत युनियनविरुद्ध त्यांच्या बाजूने युद्ध लढत होतो, तेव्हा आजचे हे सर्व दहशतवादी वॉशिंग्टनमध्ये जेवत होते. त्यांच्या या वक्तव्याचे दाखले देत हिंदुस्थानने पाकिस्तानला घेरले आहे.