डोक्यावर पाण्याचा हंडा आणून 300 झाडे वाचविण्याचा प्रयत्न

>> रवींद्र घाडगे

जेव्हा दुष्काळ पडतो, तेव्हा मेगा जमिनीलाच नाही. तर काळजाला ही पडतात.। विहिरीचे पाणी जेव्हा, तळ गाठते तेव्हा अश्रू ही कोरडवाहू, बनतात. घोटासाठी घाटा घाटातूनी पिळवटलेल्या वाटा, तापलेली माती पायी बोचलेला काटा, सुकलेले ओठ, आटलेले पोट, डोईवरून सूर्य ओकतो, ज्वालेचा लोट।… या कवितेप्रमाणे पाण्याची पातळी खालावल्याने आणि संरक्षित जलस्रोतदेखील कोरडे पडल्याने जिथे हंडाभर पिण्याचे पाणी शोधताना जीव मेटाकुटीला येतो. तिथे फळबागा कशा जगवायच्या, हा प्रश्न पडन दुष्काळाच्या तडाख्यातून फळबागांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा जिवाचा आटापिटा करून प्रयत्न करत असल्याचे भयावह चित्र सध्या दिसत आहे.

घनसावंगी मतदारसंघातील रेवगाव येथे पाण्याविना फळ झाडे सुकत आहेत. पाण्याअभावी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेली झाडे सुकू नये म्हणून रेवगाव येथील शेतकरी अनिल पाखरे हे दिवसाला ३०० हंडे पाणी टाकून वाळत असलेली आंबा आणि लिंबूची ३०० झाडं जगवण्याचा प्रयत्न करीत आहेत. रेवगाव गावात नद्या कोरड्या पडल्या आहेत. त्याचबरोबर विहिरींनी देखील तळ गाठलाय. सरकारी योजना कागदावरच आहे मदतीचा हात सोडा. परंतु लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय कर्मचारी फिरकत सुद्धा शेतकऱ्यांचा समस्या जाणून घ्यायला वेळ नसल्याने शेतकऱ्यांचा सध्याच्या परिस्थितीत फळबागा फळ झाडं पाण्याविना अक्षरशः सुकत आहेत.

शेतकरी अनिल पाखरे यांच्याकडे आठ एकर शेती आहे त्यापैकी काही क्षेत्रात ३०० झाडांना दररोज ३०० हंडे पाणी घालून झाडे जगविण्यासाठी आटापिटा सुरू आहे. लिंबाच्या झाडांना बोरासारखी फळं; परंतु पाण्याअभावी रस नाही उपयोगीचे फळ नाही. फळ पाहायला आहे, फक्त झाडे जगविण्याची आस आहे, तीन-चार दिवसाला हजार ते दिड हजार रुपये खर्चुन पाण्याचं ट्रॅकर घेऊन प्लास्टिक ड्रममध्ये साठवून झाडांना दररोज घालायचे, झाडाचे ३०० हंडे झाडांना घालायचे त्यानंतर गुरा-डोरांना पुन्हा वेगळं पाणी ड्रममधुन उपसाचे. यातच दररोज दिवस जात आहे. पाखरे हे विकतच पाणी घेऊन दररोज पत्नी, मुलगा, सून यांच्यासह झाडांना हंडा-हंडा पाणी देऊन झाडं जगवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी ४ वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातून आणलेल्या कलम केलेल्या आंब्याच्या झाडांची लागवड केली होती. गेल्यावर्षी झाडांना थोडा फार बहार आला होता. शासनाने या परिस्थितीची दखल घेऊन पाणी टंचाईचा मोठा प्रश्न सोडवावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.