म्हाडा मुख्यालयातील हेलपाट्यांपासून सुटका, नागरिक सुविधा केंद्राचे लोकार्पण

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उभारलेल्या नागरिक सुविधा केंद्राचे उद्घाटन सोमवारी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांकडून म्हाडा मुख्यालयामध्ये येणारे टपाल या नागरिक सुविधा केंद्रामध्ये स्वीकारले जाणार आहे. म्हाडा कार्यालयात टपाल देण्यासाठी प्रवेशद्वारावर रांग लावणे, कार्यालयात गर्दी करणे, वेगवेगळ्या कार्यालयांचे टपाल त्या-त्या कार्यालयात देणे आदी बाबी करण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. यावेळी अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली, म्हाडाचे अद्ययावत संकेतस्थळ तसेच प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे देखील उद्घाटन करण्यात आले.

म्हाडा मुख्यालयात उभारलेल्या या सुविधा केंद्रामध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी किऑस्क मशीन बसवले आहेत. नागरिकांनी या मशीनवर आपले नाव व मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईलवर आलेला ओटीपी मशीनमध्ये टाकल्यानंतर टोकन जनरेट होणार होईल आणि नागरिकांना एसएमएस प्राप्त होईल. नागरिकांना म्हाडा कार्यालयात द्यावयाचे टपाल दोन काउंटरवर दाखवायचे आहे. हे टपाल कुठल्या कार्यालयात द्यावयाचे आहे याबाबत कर्मचारी पडताळणी करतील. पडताळणीनंतर ज्या कार्यालयास हे टपाल द्यावयाचे आहे त्याची नोंद या टपालावर केली जाईल.

n येथील काउंटरवर टोकन नंबर व नागरिकांनी आणलेले कागदपत्र तात्काळ स्पॅन करून मूळ प्रत नागरिकांना परत केली जाणार आहे. नागरिकाला मोबाइलवर आलेल्या एसएमएसवर आपण जमा केलेले टपाल कुठल्या कार्यालयात पोहोचले याची माहिती ट्रेकिंग सिस्टमद्वारे मिळणार आहे.

n म्हाडाच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक नागरिकांचे पह्टो ओळखपत्र स्पॅन करून त्यांचे पह्टो मोबाईलमध्ये काढणार आहेत. सदर प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना तात्काळ प्रवेश पत्र दिले जाणार आहे.

अधिकाऱ्यांची ऑनलाइन अपॉइंटमेंट

n अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी डीजीप्रवेश अॅपमध्ये नोंदणी करावयाची आहे. अधिकाऱ्यांच्या वेळेनुसार नागरिकांना प्रवेशपत्र ऑनलाइन या अॅपवरच वितरीत होणार आहे.

n म्हाडाने स्पॅन केलेली सुमारे 15 कोटी कागदपत्रे (संवेदनशील वगळून) सार्वजनिक केली जाणार असून ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर येत्या आठ दिवसांत अपलोड केली जाणार आहेत.