
रत्नागिरीतील पतितपावन मंदिरात भजनासाठी गेलेल्या वयोवृद्ध भजनी बुवांना भाजपचे नेते अॅड. बाबा परुळेकर यांनी प्रवेश नाकारत भजन करण्यास रोखले. अखेर संतापलेल्या भजनी कलाकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अॅड. बाबा परुळेकर यांच्या विरोधात लेखी तक्रार केली करत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
दर शिवरात्रीला पतितपावन मंदिरात बहुजन समाजाच्या वकीने भजन आयोजित करण्यात येणार असल्याचे आगाऊ पत्र पतितपावन मंदिर व्यवस्थापनाकडे देण्यात आले होते. 26 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता पतितपावन मंदिरात सुरेंद्र घुडे, संजय मेस्त्राr, काwस्तुभ नागवेकर, सुदेश नागवेकर, मनोज भाटकर, जयवंत बोरकर हे भजनी बुवा हार्मोनियम, टाळ, मृदुंग आणि पखवाज घेऊन भजनासाठी गेले होते त्यावेळी भाजपचे नेते अॅड. प्रदीप ऊर्फ बाबा परुळेकर यांनी भजनी बुवांना मंदिरात प्रवेश करण्यास अटकाव करत इथे भजन करायचे नाही असे सांगितले.
अस्पृश्यांना प्रवेश देशातील पहिले मंदिर
दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर यांनी स्वखर्चातून जागा विकत घेऊन हिंदू धर्मातील सर्व जातीच्या लोकांसाठी देशातील पहिले मंदिर उभारले. स्पृश्य-अस्पृश्यच्या भिंती गाडून टाकण्यासाठी त्यांनी हे पतितपावन मंदिर उभारत सहभोजन सुरू केले होते. मात्र त्याच मंदिरात बहुजन समाजातील भजनी बुवांना प्रवेश नाकारल्याने संताप व्यक्त होत आहे.