26 राफेलसाठी 63 हजार कोटींचा करार

हिंदुस्थान फ्रान्सकडून 26 राफेल फायटर खरेदी करणार आहे. ही डील 63 हजार कोटी रुपयांची असून सोमवारी या डीलवर हिंदुस्थानने स्वाक्षरी केली. या डीलअंतर्गत हिंदुस्थानला 26 राफेल एम लढाऊ विमाने मिळणार आहेत. हिंदुस्थान आणि फ्रान्स यांच्या डीलने पाकिस्तानचे टेन्शन आणखी वाढले आहे. या डीलमध्ये 22 सिंगल सीटर जेट आणि चार ट्विन सीटर ट्रेनरचा समावेश आहे. या विमानाची डिलिव्हरी 2031 पर्यंत पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेंतर्गत विमान निर्मिती होईल. राफेल एम सर्वात अत्याधुनिक नौदल फायटर जेट आहे.