
स्पेसएक्स कंपनी आणि टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी केलेल्या एका दाव्यामुळे मेडिकल क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रोबोटची मेडिकल क्षेत्रात एण्ट्री झाली आहे. पुढील पाच वर्षांत रोबोट हे बेस्ट ह्युमन सर्जनच्या पुढे गेलेले आपल्याला दिसतील, असे विधान एलॉन मस्क यांनी केले आहे. मस्क यांची ब्रेन-कम्प्युटर इंटरफेस कंपनी न्युरोलिंक ब्रेन कम्प्युटर इलेक्ट्रोड इन्सर्सनसाठी रोबोटवर अवलंबून होती. हे काम मनुष्यासाठी करणे अशक्य असे होते, असे मस्क यांनी म्हटले आहे.
मस्क यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी म्हटले की, रोबोट काही वर्षांच्या आत चांगल्या ह्युमन सर्जनच्या पुढे जातील, तर पुढील पाच वर्षांत बेस्ट ह्युमन सर्जनला मागे टाकतील. अमेरिका येथील मारियो नौफल यांनी मेडिकल डिव्हाइस कंपनी मेडट्रॉनिकच्या आरोग्य क्षेत्रात रोबोटिक्सचे योगदान या विषयावर लिखाण केले होते.
यात त्यांनी म्हटले होते की, मेडट्रॉनिकने प्रोस्टेट, किडनी आणि ब्लैडर ठीक करण्यासाठी 137 रियल सर्जरीसोबत आपल्या ह्युगा रोबोटिक सिस्टमला यशस्वीपणे बनवले. या शस्त्रक्रियेचे निकाल डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा चांगले होते. तसेच 98 टक्क्यांहून अधिक यशस्वी होते. प्रोस्टेट सर्जरीसाठी 3.7 टक्के, किडनी सर्जरीसाठी 1.9 टक्के, ब्लैडर सर्जरीसाठी 17.9 टक्के राहिले. हे खूपच कमी होते.
137 सर्जरीमध्ये केवळ दोन सर्जरी परत करावी लागली. कंपनीचे पुढचे लक्ष्य हे लकवा या न्यूरोडीजेनरेटिव्ह रुग्णांसाठी ब्रेनला कंट्रोल करणारे उपकरण बनवणे आहे.