उन्हाच्या तीव्रतेमुळे नायगाव मयूर अभयारण्यातील वन्यजीवांचे हाल

उन्हाची वाढती तीव्रता वन्यजीवांवर अनेक प्रकारे परिणाम करते. उन्हाळ्यात वन्यजीव पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे जास्त दूर भटकत असून काही ठिकाणी भीषण वणवे लागण्याची शक्यता असल्याने त्यांच्या वास्तव्य स्थानांना धोका निर्माण होत असून त्यामुळे अभयारण्यातील वन्यजीवांचे हाल होत आहेत.

उन्हाळ्यात पाण्याच्या स्त्रोतांची उपलब्धता कमी झाल्यामुळे वन्यजीव पाण्यासाठी जास्त दूर प्रवास करतात. भीषण वणव्यांमुळे वन्य जीवांचे वास्तव्य धोक्यात येते. उन्हाळ्यात वन्यजीवांची निवासस्थाने कोरडी पडू शकतात, ज्यामुळे त्यांना अन्न आणि आश्रय मिळवणे कठीण होते. उन्हाळ्यातील वाढती उष्णता पक्ष्याना आणि प्राण्यांना त्रास देऊ शकते आणि त्यांना पाणी तसेच अन्न उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बीडच्या मयूर अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडले असून, ज्या पाणवठ्यामध्ये जे पाणी आहे ते योग्य नसून त्यामुळे वन्यजीवांचे पाण्यासाठी मानवी वस्तीकडे स्थलांतर होताना दिसत आहे. बीड जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे आणि त्याचाच फटका गाव खेड्यांना बसताना पहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे वन्यजीवदेखील या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहेत. नायगाव मयूर अभयारण्य हे एकमेव असे अभयारण्य आहे ज्यामध्ये चार ते पाच हजारांहून अधिक मोरांची संख्या आहे. मात्र. या अभयारण्यातील मोरांना सध्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी मिळत नसल्याने अभयारण्यातील मोर हे मानवी वस्त्यांकडे स्थलांतर करताना दिसून येत आहेत. एकंदरीतच वन विभागाने या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देणे बंधनकारक असून, वन विभाग वन्यजीवांसाठी काही ठोस पावले उचलेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.