Pahalgam Attack- पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर गृह मंत्रालयाची बंदी, पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रक्षोभक माहिती पसरवल्याबद्दल सरकारचा चाबुक!

Security personnel maintain vigil near Dal Lake amid high alert following Pahalgam terror attack
(Photo: PTI)

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी ह्ल्यात 26 पर्यटकांचा हकनाक बळी गेला. यानंतर हिंदुस्थान सरकारने सजग पावलं उचलत आता काही, प्रक्षोभक यूट्यूब चॅनल्सवर बंदी आणलेली आहे. पहलगाम घटनेनंतर कश्मिरचे खोरे हे दहशतवादाच्या छायेत असून, या परिस्थितीला कुठलेही खतपाणी घालू नये याकरता सरकारकडून ही पावलं उचलण्यात आलेली आहेत.

दहशतवादी हल्ल्यानंतर काही यूट्यूब चॅनल्सवर अतिशय चुकीची आणि दिशाभुल करणारी माहिती मोठ्या वेगाने पसरवण्यात येत आहे. यामध्ये डाॅन न्यूज, समा टीव्ही, आर्य न्यूज, जिओ न्यूज आदी चॅनल्सचा समावेश आहे. हिंदुस्थानच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार, भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर काही चॅनल्स अतिशय चुकीची माहिती पसरवत आहेत. त्यामुळे या सर्व चॅनल्सवर आता सरकारचा चाबुक चालवण्यात येत आहे. दिशाभूल करणारी माहिती आणि वक्तव्यामुळे 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्यात आलेली आहे.

हिंदुस्थानातील सांप्रदायिक घटनांवर चुकीची माहिती पसरवली जात असल्याच्या कारणांवरुन ही बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच दिशाभूल करणारी अनेक वक्तव्ये या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होत असल्याचा दावा सरकारने केलेला आहे. पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी ह्ल्यानंतर हिंदुस्थानच्या गृहमंत्रालयाकडून अनेक गोष्टीवर काटेकोरपणे नजर आहे. यामध्ये पाकिस्तानातील न्यूज चॅनल्ससह यूट्यूब चॅनल्सही सरकारच्या रडारवर आहेत.