Summer Tips- उन्हाळ्याच्या दिवसात पित्ताची समस्या वाढलीय.. मग करा हे घरगुती उपाय

उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला पित्ताचा त्रास हा वरचेवर होत असतो. तसेच सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टालमुळे आपल्या खाण्याच्या अनियमित वेळा यामुळे पित्त उसळुन येते. पित्ताच्या त्रासावर कुठेलही औषध करण्यापेक्षा घरगुती उपाय हे खूप गरजेचे आहेत. घरगुती उपायांमुळे पित्तावर मात करता येते. मुख्य म्हणजे अपूर्ण झोप, बिघडलेल्या दिनक्रमाचा सगळ्यात जास्त पोटावर परिणाम होत असतो. यातूनच मग पित्त, अॅसिडिडी, गॅसेस यांसारख्या गोष्टी वारंवार जवळपास सगळ्यांच्याच बाबतीत होतात.

पित्तावरील घरगुती उपाय

 

बडीशेप

जेवल्यानंतर अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप किंवा विड्याचे पान खाल्याने अन्नाचे चांगले पचन होते. 1 कप उकळलेल्या पाण्यात 1 चमचा बडीशेप मिसळून रातभर ठेवून द्या. सकाळी ते गाळून आणि त्यात एक चमचा मध मिसळून ते पाणी प्यावं. हे पाणी दिवसभरात 3 वेळा प्यायल्यानं पोट फुगणं आणि गॅसची समस्या दूर होते.

 

 

गुळ

सध्याच्या घडीला आपल्या जेवणाच्या बदललेल्या वेळा यामुळे अन्नपचन होत नाही. पूर्वी लोक जेवल्यानंतर शतपावली करायचे. मात्र आता लोकांकडे वेळच नसल्याने घरी गेल्यावर जेवून कधी झोपतो असं होतं. तेंव्हा दररोज जेवण झाल्यानंतर गुळ खाल्ल्याने अन्न पचनास आणि परिणामी संबंधित त्रासातून सुटका होण्यास मदत होते. गुळ तोंडात विरघळेपर्यंत चघळत राहावा ही प्रक्रिया जेवढी हळू होईल तेवढा त्याचा फायदा जास्त होईल.

 

ओवा

पित्तासाठी ओवा खाणंही खूप हितावह आहे. पोटात मुरडा आल्यासारखे वाटत असेल तर हातावर ओवा थोडा रगडून खाल्ल्यास मुरडा लगेच कमी व्हायला मदत मिळते. ओव्याचा वास आणि दाताखाली आलेल्या ओव्याच्या रसामुळे आपल्याला लगेच आरामही मिळतो. ओवा ही अशी गोष्ट आहे जी आपण सोबत सहज कुठेही जाताना बाळगू शकतो.

 

लिंबु आणि आले

बऱ्याचवेळा पोटाच्या विकारांसाठी काळा चहा लिंबू पिळून घेतला जातो. त्यामुळे निश्चित फरक पडतो, मात्र जर चहात लिंबासोबत आले देखील टाकल्यास त्याचा अधिक लाभ होतो. त्याच बरोबर नुसते आल्याचे तुकडे चोथा होईपर्यंत चघळले, त्याचा रस प्यायल्यास आणि त्यावर जर तुम्ही थोडे कोमट पाणी प्यायलात तर आपल्याला आराम मिळतो. यातून बद्धकोष्टतेचा त्रास देखील कमी होतो.

 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)