जोतिबा मंदिर आज दुपारी 4 पर्यंत दर्शनासाठी बंद

नुकत्याच झालेल्या चैत्र यात्रेनंतर दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात पाकाळणीची धांदल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 28) पहाटे 4 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.