तेलंगणा, छत्तीसगढ सीमेवर 28 नक्षलवाद्यांचा खात्मा

तेलंगणा आणि छत्तीसगढच्या सीमेवरील घनदाट जंगलात करेगुट्टा टेकडीवर गेल्या पाच दिवसांत सुरक्षा दलांनी 28 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्या बटालियनमधील 700 नक्षलवादी करेगुट्टा टेकडीवर जमले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार विविध सुरक्षा दलांतील सुमारे दहा हजारांवर जवानांनी तिथे नक्षलविरोधी मोहीम हाती घेतली. टेकडीला वेढा घालण्यात आला.