2100 रुपये देऊ असे कुणीही म्हटलेले नाही, लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खूश आहेत -नरहरी झिरवळ

सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, असे आश्वासन महायुतीने दिले होते. पण आता महायुती सरकारमधील मंत्र्यानेच पलटी मारली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, असे कुणीच म्हटले नाही, लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये परिपूर्ण आहेत आणि त्या दीड हजारांमध्येच खूश आहेत, असे वक्तव्य अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी केले आहे.