
अमेरिकेत डेल्टा एअरलाइन्सच्या विमानातून उतरल्याबद्दल एका प्रवाशाला चक्क 3 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे अडीच लाख रुपये मिळाले. रेडिट युजरने हा अनुभव शेअर करत 21 एप्रिल रोजी ही घटना घडल्याचे सांगितले. शिकागोहून सिएटलला जाणाऱ्या इंधन संतुलनाची समस्या निर्माण झाली आहे. त्याच्या निराकरणासाठी दोन प्रवाशांना विमानातून उतरावे लागणार होते. त्यांना भरपाई म्हणून 3 हजार डॉलर्स दिले जातील, असेही सांगण्यात आले. त्यानंतर दोन प्रवासी खाली उतरण्यास तयार झाले. त्यांना पैसे मिळाले.