
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानात रहाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तीन पाकिस्तानी नागरिक आहेत मात्र त्यांच्याकडे मोठ्या कालावधीसाठी व्हिसा आहे.
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकारने हिंदुस्थानात रहाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला. त्यानंतर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून देशात रहाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात तीन पाकिस्तानी नागरिक आहेत मात्र त्यांच्याकडे अधिक काळासाठी व्हिसा आहे.