Summer Tips- उन्हाळ्यात व्यायामादरम्यान होणारे डिहायड्रेशन टाळण्यासाठी, ही पेयं न विसरता प्या!

व्यायाम करणे हे निरोगी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे असते. म्हणून सीझन कुठलाही असो आपण व्यायाम करणे हे गरजेचे आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही सीझनमध्ये आपल्याला निरोगी राहण्यासाठी व्यायाम हा गरजेचा आहे. परंतु व्यायाम करतानाही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

उन्हाळ्यात व्यायाम करणे शरीरासाठी फायदेशीर असते. खासकरुन उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता होण्याचा धोका देखील वाढतो. जास्त घाम येणे शरीरात इलेक्ट्रोलाइट्स आणि आवश्यक खनिजांची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे थकवा, चक्कर येणे आणि अशक्तपणा येतो. अशा परिस्थितीत, व्यायाम करण्यापूर्वी हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे. व्यायामापूर्वी आपले शरीर हायड्रेट केले तर व्यायाम करताना तुमचे शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता कमी होते. व्यायापापूर्वी कोणती पेयं आपल्याला हायड्रेट राहण्यासाठी मदत करतील ते आपण पाहुया.

 

नारळ पाणी

नारळाच्या पाण्याला नैसर्गिक पेय म्हणतात. नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि कॅल्शियम सारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स असतात. जे शरीराला हायड्रेट ठेवतात. व्यायामापूर्वी एक ग्लास थंड नारळ पाणी पिल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते आणि घामामुळे गमावलेले इलेक्ट्रोलाइट्स देखील भरून निघतात. ते पोटासाठी हलके असते आणि लवकर पचते.

 

 

 

लिंबू पाणी

लिंबू पाणी हे स्वतःला हायड्रेटेड ठेवण्याचा एक सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. जर तुम्ही लिंबू पाण्यात थोडे मध आणि चिमूटभर मीठ घातलं तर ते वर्कआउटपूर्वीचे एक उत्तम ड्रिंक आहे. हे शरीराला डिटॉक्स करते आणि व्यायामासाठी आवश्यक असलेली ऊर्जा देखील प्रदान करते.

 

 

 

 

बेल फळाचा ज्यूस

उन्हाळ्यात बेलफळाचा रस हा एक देशी सुपर पेय आहे. हे शरीराला थंड करते आणि डिहायड्रेशन टाळते. बेलफळाच्या रसात नैसर्गिक साखर असते, जी त्वरित ऊर्जा देते. सकाळी व्यायामापूर्वी ते प्यायल्याने पचनसंस्था देखील सुधारते.

 

 

 

 

कलिंगडाचा रस

कलिंगडामध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असते. त्याचा रस प्यायल्याने शरीर त्वरित हायड्रेट होते. यामध्ये असलेले लायकोपीन, व्हिटॅमिन ए आणि सी शरीराला ऊर्जा प्रदान करतात. वर्कआउटपूर्वी टरबूजाचा रस हा एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहे.