पाकड्यांकडून तिसऱ्यांदा LOC जवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन; हिंदुस्थानचे चोख प्रत्युत्तर

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकड्यांकडून शस्त्रसंधी उल्लंघटनाच्या घटना घडत आहेत. आता पाकिस्तानने LOC ( नियंत्रण रेषेजवळ) शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची घटना पाकिस्तानकडून तिसऱ्यांदा घडली आहे. हिंदुस्थाननेही पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. याआधी 24 एप्रिल रोजीही पाकिस्तानने कोणत्याही कारणाशिवाय नियंत्रण रेषेवर गोळीबार केला होता. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरील त्यांच्या अनेक चौक्यांवरून गोळीबार केला होता. त्याला सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

26-27 एप्रिल 2025 च्या रात्री पाकिस्तानी लष्कराने तुतमारी गली आणि रामपूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. हिंदुस्थानने या गोळीबाराला प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर (एलओसी) तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून वारंवार युद्धबंदीचे उल्लंघन केले जात आहे आणि नियंत्रण रेषेवर गोळीबार केला जात आहे. पाकिस्तानने सलग तिसऱ्या रात्रीही गोळीबार सुरू ठेवला. 26-27 एप्रिलच्या रात्री, पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी तुतमारी गली आणि रामपूर सेक्टर भागात नियंत्रण रेषेजवळ गोळीबार सुरू केला. हिंदुस्थानी सुरक्षा दलाने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

25-26 एप्रिलच्या रात्री पाकिस्तानी सैन्याकडून त्यांच्या अनेक चौक्यांवरून रात्रभर गोळीबार केला. यापूर्वी 24 एप्रिललाही पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ गोळीबार केला होता. पाकिस्तानकडून गोळीबाराच्या घटना सतत घडत आहेत. सध्या भारतीय सैन्य सीमेवर सतर्क आहे आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे.