सराईतांकडून पिस्तूल, शस्त्रे जप्त; पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पुणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-1 ने दांडेकर पूल परिसरात मोठी कारवाई करीत चार सराईत गुन्हेगार आणि तडीपार गुंडांकडून एक पिस्तूल आणि दोन धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेले चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. शुक्रवारी (25 रोजी) खंडणीविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक राजेश माळेगावे आणि त्यांचे सहकारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी ‘मोक्का’ गुन्ह्यातील आरोपी गणेश गौतम वाघमारे (वय 28, रा. दांडेकर पूल) याच्याकडे गावठी पिस्तूल असून, तो या परिसरात दहशत पसरवीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार वाघमारेला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलीस तपास करीत आहेत. वाघमारेने मित्र तेजस काशिनाथ शेलार (वय 25, रा. दांडेकर पूल) याने पिस्तूल विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार शेलारला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पर्वती याच कारवाईदरम्यान खंडणीविरोधी पथकाने पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या दोन गुंडांना अटक केली. प्रथम ऊर्फ पॅडी सुरेश म्हस्के (वय 20, रा. दांडेकर पूल) आणि रोशन अविनाश काकडे (वय 24, रा. सिंहगड रोड) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांच्याकडून दोन धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.