मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपुरात सर्वाधिक 2458 पाकडे, महाराष्ट्रात 5023 पाकिस्तानी घुसखोर; 107 जण बेपत्ता, टेंशन वाढले

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध्यांचा बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने आता घुसखोर पाकिस्तानींना हिंदुस्थान सोडण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी पोलिसांनी राज्यात शोधमोहीम घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यानुसार महाराष्ट्रातही वेगाने कारवाई सुरू करण्यात आली असून 48 तासांत तब्बल 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत. विशेष म्हणजे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये सर्वाधिक 2458 पाकिस्तानी आढळले आहेत, तर ठाण्यात 1106 पाकिस्तानी आढळले आहेत. मात्र एकूण पाकिस्तानींपैकी तब्बल 107 जण बेपत्ता असल्याचेही समोर आले आहे.

कश्मीर डायरी

कोम्बिंग ऑपरेशन सुरूच

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराकडून तिसऱया दिवशीही कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते.

आम्ही हल्ला केलाच नाही; टीआरएफचे घूमजाव

आम्ही हल्ला केलाच नाही. आमचा डिजिटल प्लॅटफॉर्म हॅक करून त्यावर हल्ल्याची जबाबदारी घेतल्याची पोस्ट टाकली, असे टीआरएफने म्हटले आहे.

तटस्थ चौकशीला पाकिस्तान तयार

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तान या हल्ल्याप्रकरणी ‘तटस्थ चौकशी’ला तयार असल्याचे म्हटले आहे.