मुंबईच्या उंबरठ्यावर पाणीटंचाई, भिवंडी, शहापूर आणि कसाऱ्यासह ठाणे जिल्हय़ात पाण्यासाठी वणवण

छाया - संजय भोईर

एप्रिल अखेरीसच मुंबईच्या उंबरठ्यावरील ठाणे जिह्याला भीषण पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्याची तर ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. भातसा, तानसा, वैतरणा धरणातील डोळय़ांना दिसणाऱया अथांग पाण्याचा एक टिपूसही शहापूर तालुक्याला मिळत नसल्याने हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात वणवण भटकणाऱया महिलांच्या डोळय़ांतून मात्र घळाघळा पाणी वाहत आहे. ही परिस्थिती शहापूर, खर्डी, कसाऱयासह 200 हून अधिक गावपाड्यांच्या नशिबी आली आहे.