यूट्यूबवरून हटवली ‘अबीर गुलाल’ची गाणी

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ चित्रपट वादात सापडलाय. ‘अबीर गुलाल’वर हिंदुस्थानात बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे हा चित्रपट हिंदुस्थानात प्रदर्शित होणार नाही. अशातच या चित्रपटातील दोन गाणी यूटय़ूबवरून हटवण्यात आली आहेत. खुदया इश्क आणि अंग्रेजी रंगरसिया ही दोन्ही गाणी आता यूटय़ूबवर नाहीत. काही दिवसांपूर्वी दोन्ही गाणी प्रोडक्शन हाऊस आणि सारेगमच्या यूटय़ूब चॅनेलवर प्रदर्शित झाली होती.