
एलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाचा सायबर ट्रक गुजरातमधील सुरत शहरात अखेर पोहोचला. हिंदुस्थानात पोहोचलेला सायबर ट्रक हा पहिला आहे. सुरतचे प्रसिद्ध उद्योगपती, हिरे व्यावसायिक लवजी बादशहा यांनी हा ट्रक खरेदी केलाय. लवजी बादशाह यांनी दुबई पासिंग येथून हा टेस्ला सायबर ट्रक ऑर्डर केलाय. तो मुंबईमार्गे सुरतला पोहोचला. हा ट्रक कोणी ऑर्डर केला, याची कोणालाही कल्पना नव्हती. याला सायबर ट्रक असे नाव असले तरी ही एक प्रकारची कार आहे. या कारची रचना पाहून असे वाटते की ती रोबोटिक चित्रपटाच्या सुपरहिरोसाठी बनवण्यात आली आहे. याची डिझाईन अन्य कारच्या डिझाईनपेक्षा वेगळी आहे. या ट्रकमध्ये विशेष बुलेटप्रूफ काचदेखील आहे. टेस्लाच्या कार हिंदुस्थानात मिळणार असून टेस्लाचा पहिला शोरूम मुंबईतील वांद्रे-कुर्ला काॅम्प्लेक्स (बीकेसी) येथे उघडणार आहे. सायबर ट्रकची बॉडी अल्ट्रा-हार्ड स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली आहे. या ट्रकमध्ये अल्ट्रा-स्ट्राँग ग्लासचा वापर करण्यात आला आहे.