
केंद्रीय लोक सेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता कोणाला किती गुण मिळाले आहेत याचा सविस्तर स्कोअरकार्ड जारी करण्यात आला आहे. यूपीएससीने आपल्या अधिपृत वेबसाईट upsc.gov.in वर गुणपत्रिका जारी केली आहे. यात पहिली आलेल्या शक्ती दुबेला मेन्स परीक्षेत 843 तर मुलाखतीत 200 गुण मिळाले आहेत. देशात दुसरी आलेली हर्षिता गोयलला मेन्समध्ये 851 तर मुलाखतीत 187 गुण मिळाले आहेत. देशातून तिसरा आलेला महाराष्ट्राचा अर्चित डोंगरेला मेन्समध्ये 848 तर मुलाखतीत 190 गुण मिळाले आहेत. शक्ती दुबे इतके 200 गुण मिळाले असते तर अर्चित डोंगरे देशात पहिला आला असता. यूपीएससीने परीक्षेतील प्रीलिम्स, मेन्स आणि फायनल टप्प्यातील कटऑफसुद्धा जारी केले आहेत. यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेतील जनरल कॅटेगरीचा कटऑफ 87.98 टक्क्यांपर्यंत गेला आहे. मेन्स परीक्षेत 729 आणि फायनलचा कटऑफ 947 वर आहे.
- महाराष्ट्राच्या अर्चित डोंगरेला मेन्समध्ये शक्ती दुबेपेक्षा जास्त गुण आहेत. मेन्समध्ये शक्ती दुबेला 843 तर अर्चित डोंगरेला 848 गुण मिळाले आहेत, परंतु मुलाखतीत त्याला कमी गुण मिळाल्याने तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला.
टॉपर मेन्स मुलाखत एकूण गुण
टॉपर – मेन्स – मुलखात – एकूण गुण
शक्ती दुबे 843 200 1043
हर्षिता गोयल 851 187 1038
अर्चित डोंगरे 848 190 1038
मार्गी शाह 831 210 1035
आकाश गर्ग 831 201 1032
कोमल पुनिया 856 176 1032
आयुषी बन्सल 821, 210 1031
राज कृष्ण झा 831 200 1031
आदित्य अग्रवाल 854 173 1027
मयंक त्रिपाठी 843 184 1027