
ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानी तरुणाची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. एकम सिंग साहनी (18) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पंजाबच्या पतियाळा येथील रहिवासी आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स शहरातील एका कार पार्ंकगमध्ये एका तरुणाशी झालेल्या वादानंतर काही तरुणांनी एकम सिंगवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर वडील अमरिंदर सिंग साहनी यांना प्रचंड धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेत या घटनेचा तपास सुरू केला. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून कॅनडा, अमेरिका, ब्रिटन या ठिकाणी हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या हत्या आणि अपघाताचे प्रमाण वाढले आहे.