ब्रिटिश राजकुमारावर आरोप करणाऱ्या महिलेचा मृत्यू, व्हर्जिनिया गिफ्रे शेतात आढळली मृतावस्थेत; आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय

ब्रिटनचे प्रिन्स अँडय़ू यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या व्हर्जिनिया गिफ्रे ही महिला मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. व्हर्जिनियाने शेतात आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे, परंतु पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 2021 मध्ये व्हर्जिनियाने ब्रिटनच्या प्रिन्स अँडय़्रूविरुद्धही खटला दाखल केला होता. गिफ्रेने आरोप केला होता की, जेव्हा ती 17 वर्षांची होती तेव्हा जेफ्री एपस्टाईन तिला अँडय़्रूकडे घेऊन गेला आणि राजपुमाराने तिचे लैंगिक शोषण केले. अँडय़्रूला पहिल्यांदा आणि दुसऱयांदा भेटली तेव्हा ती फक्त 17 वर्षांची होती. व्हर्जिनियाच्या या आरोपानंतर प्रिन्स अँडय़्रू यांना राजघराण्यातून काढून टाकण्यात आले होते. अमेरिकेतील अनेक मोठय़ा अब्जाधीशांना मुली पुरवणाऱ्या जेफ्री एपस्टाईनविरुद्ध व्हर्जिनियाने आवाज उठवला होता. व्हर्जिनियामुळेच जेफ्री एपस्टाईनविरुद्ध खटला सुरू होऊ शकला. व्हर्जिनियानेच न्यायालयात जेफ्रीविरुद्ध साक्ष दिल्याने जेफ्रीला वेश्या व्यवसायाचे नेटवर्प चालवणे, मोठय़ा संख्येने महिलांचे लैंगिक शोषण करणे आणि मानवी तस्करी केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते.