
महाराष्ट्रात पाच हजारपेक्षा पाकिस्तानी नागरिक आहेत, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. सर्वाधिक नागरिक हे नागपूर आणि ठाणे जिल्ह्यात असल्याचे सरकारने सांगितले आहे. तसेच काही पाकिस्तानींचा थांगपत्ताही नाही, अशी कबुलीही सरकारने दिली आहे.
प्रत्येक राज्यात किती पाकिस्तानी आहेत, याची माहिती केंद्र सरकारने राज्य सरकारांकडून मागवली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 48 शहरांत 5 हजार 23 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत. यापैकी सर्वाधिक नागरिक हे नागपूर शहरात आढळले आहेत. नागपूरमध्ये 2458 नागरिक असून ठाण्यात 1106 पाकिस्तानी सापडले आहेत. 5 हजार 23 पाकिस्तानी नागरिकांपैकी फक्त 51 नागरिकांकडे वैध कागदपत्र सापडली आहेत. धक्कादायक म्हणजे 107 नागरिक हे बेपत्ता आहेत. म्हणजेच या 107 नागरिकांचा कुठलाही थांगपत्ता नाहिये.
महाराष्ट्रात असलेले काही पाकिस्तानी हे सार्क व्हिजा आणि शॉर्ट टर्म व्हिजावर आहेत. सार्क व्हिसा आणि शॉर्ट टर्म व्हिसावर असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना दोन दिवसात हिंदुस्थान सोडण्यास सांगितले आहे. तर जे पाकिस्तानी मेडिकल व्हिसावर आहेत त्यांना 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.