लंडनमध्ये हिंदुस्थानी नागरिकांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध, पाक अधिकाऱ्याकडून चिथावणीखोर कृत्य

जम्मू कश्मीरच्या पहलगामध्ये हिंदुस्थानी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ लंडनमध्ये हिंदुस्थानी नागरिकांनी निषेध नोंदवला. पण तिथे पाकिस्तांनी अधिकाऱ्यांनी हिंदुस्थानी नागरिकांकडे पाहून चिथावणीखोर कृत्य केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हिंदुस्थानी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी लंडनच्या पाकिस्तानी उच्चायोगाच्या बाहेर निषेध आंदोलन केले. तेव्हा एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने विंग कंमांडर अभिनंदन यांचा चहा पितानाचा फोटो हातात घेतला आणि गळा कापण्याचा इशारा केला होता.

आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या 26 लोकांवर श्रद्धांजली वाहिली. यावेळी हिंदुस्थानचा तिरंगा हाती घेत देशवासियांनी भारतमाता की जय आणि पाकिस्तान मुर्दाबादचा नाराही दिला.