Photo – आधी पुनर्वसनाची हमी द्या, प्रभादेवीचे रहिवासी रस्त्यावर उतरले

आधी आमच्या पुनर्वसनाची हमी द्या आणि नंतरच एल्फिन्स्टन ब्रीज तोडा, अशी आक्रमक भूमिका घेत प्रभादेवीचे शेकडो रहिवासी आज रस्त्यावर उतरले. मात्र एमएमआरआरडीच्या माध्यमातून जबरदस्तीने ब्रीजवर बुलडोझर चालवण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी पुलाचे पाडकाम बंद पाडले. रात्री उशिरापर्यंत शेकडो रहिवाशांनी ब्रीजवरच ठाण मांडले.

( सर्व फोटो – रुपेश जाधव )