
दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांविषयी बोलताना मिंधेंचे खासदार नरेश म्हस्के यांना ‘जे लोक कधीही विमानात बसले नाहीत, त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानाने महाराष्ट्रात आणले’ असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या चमकोगिरीचा शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अपघाताने खासदार झालेल्या नरेश म्हस्के यांनी वाचाळ वक्तव्य थांबवावे अशा शेलक्या शब्दात सुनावले.
हा पैशांचा माज
दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले आहेत. संपूर्ण देश निषेध करत आहे आणि येथे चमकोगिरी करणारा ठाण्याचा खासदार कश्मीरमधील प्रवाशांना विमानाने आणल्याचे सांगून पैशांचा माज दाखवत आहे अशी ‘एक्स’वर पोस्ट करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी सुनावले. म्हस्के गलिच्छ राजकारण करत आहे. असंवेदनशील नरेश म्हस्केंचा जाहीर निषेध दिघे यांनी ‘एक्स’ पोस्टवर केला.
नेटकऱ्यांनी धू धू धुतले
सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी म्हस्के यांना चांगलेच धू धू धुतले. ‘थोडी तरी लाज आहे का.. हा तर सत्तेचा माज, तुमच्या बापाचे विमान आहे का? गद्दार बोलला..’ अशा शब्दात नेटकऱ्यांनी म्हस्केंचा समाचार घेतला.
आधी 14 गावांचा प्रश्न सोडवा…
कश्मीरमध्ये जे घडलं ते वाईटच आहे पण एक ‘साहेब’ कश्मीरला गेले. अहो, त्यांना नवी मुंबईतील 14 गावांचा प्रश्न अजून सोडवता आला नाही. कश्मीरचा प्रश्न काय सोडवणार, असा जोरदार अप्रत्यक्ष टोला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता आपल्या भाषणात लगावला. हल्ल्याच्या निषेधार्थ दिवा येथे निघालेल्या निषेध मोर्चात ते म्हणाले की, त्यांना स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडवता येत नाहीत आणि हे ‘साहेब’ थेट कश्मीरला गेले, असेही पाटील यांनी सांगितले.