भाजप खासदार निशिकांत दुबे यांची गुलमर्गमध्ये हाय–प्रोफाइल पार्टी; कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल

जम्मू-कश्मीरसारख्या संवेदनशील ठिकाणी गुलमर्गमध्ये भाजप खासदार निशिकांत दुबे यांची हाय-प्रोफाइल पार्टी कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली. दुबे यांच्या पार्टीला सुरक्षा, मग पहलगाम येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षा रक्षक का नव्हता, अशी चर्चा सुरू आहे. निशिकांत दुबे यांच्या हाय-प्रोफाइल पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहलगाम हल्ल्याच्या दहा दिवस आधी भाजप खासदार निशिकांत दुबे यांची गुलमर्गमध्ये हाय-प्रोफाइल पार्टी पार पडली. दुबे यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडला. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक प्रमुख नेते उपस्थित राहिले होते. पण, पहलगाम येथे पर्यटकांच्या  सुरक्षेसाठी एकही सुरक्षा रक्षक नव्हता. सामान्य माणसांच्या जीवाला काहीच किंमत नाही का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून केला जात आहे.